हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:08 IST2019-05-13T13:07:48+5:302019-05-13T13:08:59+5:30

अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला.

Firing of a young man for no informing the hotel address | हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार

हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने छऱ्याच्या बंदुकीतून युवकावर गोळीबार

ठळक मुद्देएकाला अटक : सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला खरा प्रकार

पुणे : अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. अगोदर पत्ता माहित नाही, असे का सांगितलेस म्हणून दारु पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडताना त्याच्यावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे़. 
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय २८, रा़ सध्या दापोडी, मुळ-अहमदनगर) याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे़. हा प्रकार शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडला़.
याप्रकरणी सनी चौधरी (वय १७, रा़ अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे़. छऱ्याच्या बंदुकीतील गोळी चौधरीच्या उजव्या पायाच्या पोटरीला व डाव्या पायाच्या मांडीला लागून जबर दुखापत झाली आहे़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सनी चौधरी हा सुब्बाननल्लाह हॉटेलमध्ये जेवण करुन घरी जात होता़. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघे जण आले़. त्यांनी सनीला प्यारा हॉटेल कोठे आहे, असे विचारले़ त्याने सुरुवातीला मला माहिती नाही, असे सांगितले़ त्यांनी दमबाजी केल्यानंतर त्याने प्यासा हॉटेल दाखविले़. अगोदर का सांगितले नाही, याचा राग येऊन त्यांनी सनीला मारहाण करुन शिवीगाळ केली़ मारहाण करुन होंडे याने त्याच्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला़ त्यात तो जखमी झाला़. 
याबाबतची माहिती मिळाल्यावर फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली़ सुरुवातीला त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत़. पोलिसांनी सिटी पोस्ट, प्यारा हॉटेल समोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले़. तेव्हा सिटी पोस्ट येथे तो रात्री १२ वाजता गाडीत बसताना दिसत होता़ तर प्यारा हॉटेलबाहेर पहाटे साडेतीन वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता़. त्यानंतर त्याने खरी हकीकत सांगितली़. त्यानुसार आरोपींना त्याने नंतर हॉटेल दाखविले़. आरोपींनी पैसे दिल्यावर तो प्यासा हॉटेलमधून दारु घेऊन आला़. त्यांनी गाडीतच बसून दारु पिली़. त्यानंतर त्यांनी तुला डेक्कनला सोडतो असे सांगितले व गाडी घेऊन ते निघाले़. गाडीत त्यांनी सनीला तू अगोदर प्यासा का दाखविले नाही, यावरुन त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली़. तेव्हा तो घाबरुन ओरडू लागला़ तेव्हा त्यांनी मरीआई गेटजवळ त्याला गाडीतून उतरताना गोळीबार करुन जखमी केले़. त्यानंतर तो अपर इंदिरानगर येथील घरी गेला व नंतर तो बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गेला़. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले़ तेथे हा प्रकार शिवाजी रोडवर घडल्याने फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़. पोलीस उपनिरीक्षक यश सूर्यवंशी यांनी याप्रकरणी तपास करुन एकाला अटक केली आहे़. 

Web Title: Firing of a young man for no informing the hotel address