शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

पेट्रोल पंपावरील दरोड्यात गोळीबार; तीन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 6:43 PM

Latur Crime News : लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल : रक्कमेसह दागिनेही केले होते लंपास

ठळक मुद्देइतक्यात पिस्तुल घेऊन आलेल्या आरोपीने पेट्रोल पंपाचे मालक हिरेमठ असलेल्या दिशेने दुसरी गोळी झाडली. तद्‌नंतर त्यांच्या जवळ जाऊन आणखी एक गोळी झाडली.

लातूर : पेट्रोल पंपावर गोळीबार करुन दरोडा टाकल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी तीन आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांनी सांगितले, गातेगाव ठाण्याच्या हद्दीतील हिरेमठ पेट्रोल पंपावर १६ जानेवारी २०१७ रोजी दरोडा पडला. सदर घटनेत मोटारसायकलवरून आलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादीच्या कानपट्टीला पिस्तुल लावले आणि कॅश दे असे फर्मावले व हवेत गोळी झाडली. दुसऱ्या आरोपीने कत्तीने बॅग कापून घेतली. इतक्यात पिस्तुल घेऊन आलेल्या आरोपीने पेट्रोल पंपाचे मालक हिरेमठ असलेल्या दिशेने दुसरी गोळी झाडली. तद्‌नंतर त्यांच्या जवळ जाऊन आणखी एक गोळी झाडली.

त्याने कपाटाची काच फुटली. त्याचवेळी अन्य आरोपीने हिरेमठ यांच्या हाताला कत्तीने मारले. यावेळी त्यांच्या गळ्यातील व हातातील दागिने हिसकावले. कॅश बॅगमधून ७० हजार रुपयेही चोरले. हा थरार सुरू असताना उपस्थितांनी व फिर्यादीने पळून जाणाऱ्या आरोपींवर दगडफेक केली. त्यावेळी आरोपीचे पिस्तुल पडले. त्यानंतर तिन्ही आरोपी मुरुडच्या दिशेने पळून गेले. या संदर्भात पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींसह तपासाअंती एका महिला पोेलीस कर्मचाऱ्याचाही गुन्ह्यात समावेश करुन दोषारोपपत्र दाखल केले. त्यात महिला पोलीस कर्मचा-याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

या प्रकरणात २४ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी आरोपी प्रभुलिंग महादेव लखादिवे, प्रदीप लिंबाजी ओगले, सचिन संभाजी कावळे या तिघांना कलम ३९४ तसेच कलम ७ सह कलम २५ (१-ए) शस्त्र अधिनियम अन्वये उपरोक्त शिक्षा फर्मावली. या खटल्यात सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांना ॲड. वैशाली वीरकर-सूर्यवंशी, परमेश्वर तल्लेवाड यांनी सहाय्य केले. पोलीस निरीक्षक बी.आर.सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. चव्हाण यांनी तपास केला. तर जीवन नारायण राजगीरवाड, पाेहेकॉ बक्कल नंबर ८१६ यांनी सहाय्य केल्याचे वकीलांनी सांगितले.

टॅग्स :FiringगोळीबारLife Imprisonmentजन्मठेपlaturलातूरCourtन्यायालयDacoityदरोडाRobberyचोरी