Firing on Omi Kalani team's office bearer Sandeep Gaikwad, police saved his life | पोलिसांमुळे वाचला जीव, ओमी कलानी टीमच्या पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार

पोलिसांमुळे वाचला जीव, ओमी कलानी टीमच्या पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार

ठळक मुद्देओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर - ओमी कलानी टीमचा पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक असलेले संदीप गायकवाड मित्रांसह बुधवारी रात्री ११ वाजता श्रीराम चौकातून जात होते. त्यावेळी कारमध्ये दबा देऊन बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांची पेट्रोलींग करणारी गाडी आल्याने संदीपचा जीव वाचला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


उल्हासनगरातील ओमी कलानी टीमचे पदाधिकारी असलेले संदीप गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री ११ वाजता मित्र जहागीर मोरे यांच्या सोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. त्यावेळी कार मध्ये दबा देऊन बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. हल्ल्याच्या दरम्यान पेट्रोलींग करणारी पोलीस गाडी आल्याने, संदीप याने पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्या दरम्यान हल्लेखोरांनी कारसह पळ काढला. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोरांनी कार उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात टाकून धूम ठोकली. पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी ताब्यात घेतली असून तपासासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

ओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमावर गुन्हा दाखल केला. हल्लेखोर लवकरच जेरबंद होण्याची माहिती विठ्ठल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. संदिप हा कल्याण मटका जुगार धंदा चालवीत असल्याची चर्चा शहरात होत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर येण्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Firing on Omi Kalani team's office bearer Sandeep Gaikwad, police saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.