नारायणगाव येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावत हवेत गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:37 IST2020-03-02T16:36:24+5:302020-03-02T16:37:18+5:30

माझे तुझ्यावर प्रेम आहे; तू माझ्याबरोबर लग्न कर असा तगादा दोन वर्षांपासून तगादा

Firing at Narayangaon threatening the girl from one side relationship | नारायणगाव येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावत हवेत गोळीबार 

नारायणगाव येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावत हवेत गोळीबार 

नारायणगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावित हवेत गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सविंदणे (ता. शिरूर) येथील एका तरुणाला आज (दि .३) अटक केली आहे. या तरुणाकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे , ही घटना पुणे - नाशिक महामार्गावरील जांबुत फाटा येथे घडली , अशी माहिती नारायणगावपोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.अक्षय भाऊसाहेब दंडवते (वय २२, रा . सविंदणे (ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे , तरुणीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक एन.सी.जढर यांनी दिलेल्या माहितीनुसार , अवसरी (ता. आंबेगाव) येथील एकवीस वर्षीय तरूणी व आरोपी अक्षय हे मंचर येथे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख होती. माझे तुझ्यावर प्रेम आहे; तू माझ्याबरोबर लग्न कर असा तगादा दोन वर्षां पासून लावला होता. याबाबत या पुर्वी मुलीने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान तरुणी आळेफाटा येथील सूर्या पोलिस अकॅडमीमध्ये पोलिस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती. सध्या तरुणी जांबुत फाटा येथील नातेवाईकांकडे राहत होती. अक्षय दंडवते हा सध्या वाफगाव (ता. खेड) येथे नातेवाईकांकडे रहात होता. तरुणी रविवारी सायंकाळी मैत्रीनी सोबत आळेफाटा येथून दुचाकीवरून जांबुतफाटा येथे येत असताना अक्षय याने तरुणीला थांबवले. तुज्या बरोबर बोलायचे आहे. तू माज्या बरोबर चल असे म्हणून तरुणीला अक्षय याने धमकावले. तरुणी येण्यास नकार देत होती.या प्रकारामुळे स्थानिक नागरिक जमा झाले. धमकवण्यासाठी अक्षय याने पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला.नागरिक जमा झाल्यामुळे तो दुचाकीवरून फरार झाला. 

Web Title: Firing at Narayangaon threatening the girl from one side relationship