फुकटचं चिकन घेण्यासाठी नकली बंदुकीतून हवेत गोळीबार; नागरिकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:06 IST2020-07-02T05:00:16+5:302020-07-02T07:06:05+5:30
वसई पूर्वेच्या सीताराम बाप्पानगर येथे इरफान कुरेशी याच्या दुकानावर रविवारी रात्री ९ वाजता तीन तरुण चिकन घेण्यासाठी आले होते.

फुकटचं चिकन घेण्यासाठी नकली बंदुकीतून हवेत गोळीबार; नागरिकांमध्ये दहशत
नालासोपारा : चिकनच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी विक्रेत्याला घाबरवण्यासाठी नकली बंदुकीतून हवेत दोनदा गोळीबार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बंदुकीचा आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. याप्रकरणी सचिन सिंग (४५) आणि किरण सकपाळ (३३) या आरोपींना माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे.
वसई पूर्वेच्या सीताराम बाप्पानगर येथे इरफान कुरेशी याच्या दुकानावर रविवारी रात्री ९ वाजता तीन तरुण चिकन घेण्यासाठी आले होते. चिकन घेतल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि नकली बंदुकीतून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.
दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार जयेश सिंग हा फरार आहे. आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले.