घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लागली आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:11 IST2019-03-29T18:10:19+5:302019-03-29T18:11:09+5:30

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

The fire took place near Ghatkopar railway station | घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लागली आग 

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लागली आग 

ठळक मुद्देटॉप टेन मोबाईलच्या दुकानाला आज दुपारी अडीजच्या सुमारास आग लागली आहे. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

मुंबई - घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेकडील गेस्ट हाऊसजवळ टॉप टेन मोबाईलच्या दुकानाला आज दुपारी अडीजच्या सुमारास आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात आलं. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Web Title: The fire took place near Ghatkopar railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.