अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल; निवडणूक भरारी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:41 IST2019-04-09T13:36:57+5:302019-04-09T13:41:03+5:30
निवडणुकीसाठी तयार केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल; निवडणूक भरारी पथकाची कारवाई
नवी मुंबई - कोपरा येथे हॉटेलवर भाजपचे अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी तयार केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
भरारी पथक ७ एप्रिलला कोपरा गाव परिसरातून गस्त घालत असताना तेथील निरसुख पॅलेस हॉटेलवर डिजिटल बॅनर आढळून आला. त्या बॅनरवर भाजपचा जाहिरात करणारा संदेश आणि कमळ चिन्हही छापण्यात आले आहे. दक्षता पथकाने हॉटेल मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी होर्डिंग लावण्याचा सांगाडा भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती दिली. भरारी पथकाने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर उपायुक्तांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दक्षता पथकाने खारघर पोलीस ठाण्यात होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.