शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

...अखेर गुरख्याच्या खुनाचा उलगडा, मुलीच्या छेडछाडीच्या संशयावरून केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 8:27 PM

Crime News : गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत  सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दहीपूल भागात खुनाची घटना घडली होता. संशयावरून पिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (२७, रा. गंगाघाट, मुळ सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) यास गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली.

नाशिक : नेपाळचा मूळ रहिवासी असलेला व सध्या निफाड तालुक्यातील माडसांगवी येथे गुरखा  म्हणून राहणारा 21 वर्षीय युवक हिरालाल प्रजापती याचा आठवडाभरपूर्वी मध्यरात्री लाकडी दांड्याने मारहाण करुन दहीपुलावर खून करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत  सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दहीपूल भागात खुनाची घटना घडली होता. पोलिसांनी तपासला गती देत या भागातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयावरून पिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (२७, रा. गंगाघाट, मुळ सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) यास गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. मयत हिरालाल प्रजापती (२१, रा. मडसांगवी) याने खरे याच्या मुलीची छेड काढल्याची कुरापत काढून लाकडी दांड्याने हल्ला चढवून ठार मारल्याची कबुली दिली आहे.

Hathras Gangrape : 'निर्भया'च्या वकील सीमा कुशवाह यांनाही पोलिसांनी रोखलं, पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव

पथकाने त्यास गंगा घाटावरील दुतोंड्या मारूतीजवळून ताब्यात घेतले. मयत प्रजापती हा गंगाघाट येथे आला असता, त्याने आपल्या मुलीची छेड काढल्यचा खरे यास संशय आला. मद्यपी खरे याने लाकडी दंडुका घेत त्याचा पाठलाग सुरु केला. प्रजापती याला दहीपुलावर एकटे गाठून लाकडी दांड्याने मारहाण करुन पलायन केले होते. दरम्यान, पाठलाग करण्यासाठी खरे याने एक दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेलतल्याचे समोर येत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली अजय शिंदे, सहायक निरिक्षक सचिन खैरणार, महेश कुलकर्णी आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत अखेर उलगडा केला. भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना याचे धागेदोरे मिळवून संशयिताला बेड्या ठोकण्यास मात्र वाघ यांच्या पथकाला यश आले.

टॅग्स :ArrestअटकNashikनाशिकPoliceपोलिसMolestationविनयभंग