अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरा; आयपीएस अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:59 IST2019-02-06T20:55:31+5:302019-02-06T20:59:47+5:30
पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि त्यांचे कामकाज अद्यावत व पारदर्शी पद्धतीने व्हावे, यासाठी अद्यावत साधन सामुग्रीचा अवलंब केला जात आहे.

अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरा; आयपीएस अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई - राज्य पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त ते अधीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) आॅनलाईन भरण्याची सूचना सर्व पोलीस घटक प्रमुखांना करण्यात आली आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि त्यांचे कामकाज अद्यावत व पारदर्शी पद्धतीने व्हावे, यासाठी अद्यावत साधन सामुग्रीचा अवलंब केला जात आहे. त्याचअनुंषगाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे ‘एसीआर’ आॅनलाईन पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उपअधीक्षक/ सहाय्यक आयुक्त ते अधीक्षकापर्यंतचे (भोपोसे) अधिकाऱ्यांचे २०१६-१७ पासूनचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरण्याची सूचना पोलीस महासंचालकांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पूर्ण करावयाचे आहे.