तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:11 IST2019-05-13T16:09:06+5:302019-05-13T16:11:25+5:30

भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.  

filed a complaint against accused for molestation | तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

पिंपरी : भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    सौरव निकम (वय २२, रा. कासारवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी व फिर्यादी हे एकाच वर्गात शिक्षण घेत असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी हा फिर्यादीला रात्री अपरात्री फोन करुन लग्न करण्याचा तगादा लावत होता. लग्न न केल्यास भावाला मारुन टाकीन तसेच तुझ्यासोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करीन अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीला हाताने मारहाण करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: filed a complaint against accused for molestation