Video : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:27 IST2019-07-15T14:25:50+5:302019-07-15T14:27:50+5:30
दोन्ही टोळ्या भांडुपमधील असल्याची माहिती मिळत आहे.

Video : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी
नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील गरम मसाला हॉटेलच्या मागच्या भागात दोन टोळ्यांत टोळीबार झाला असून दोन्ही टोळ्या भांडुपमधील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रविवारी मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. अमित भोगले आणि सागर जाधव यांच्या या दोन टोळ्या असून दोन्ही भांडुपमधील असल्याची माहिती मिळत आहे.
सागर जाधव हा साथीदारांसह गरम मसाला बारमध्ये आला होता. यावेळी भोगलेची टोळी तिथे आली असता जाधवने पळ काढला. त्यामुळे भोगले याने त्याचा पाठलाग करत गोळीबार केला. परंतु जाधवने सोसायटीच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याने तो वाचला. मात्र, भिंतीवरील काचा लागल्याने तसेच खाली पडल्याने तो जखमी झाला आहे. सागर जाधव हा भांडुपचा भाजपचा कार्यकर्ता आणि माथाडी टोळीचा असल्याचे समजते. याबाबत रबाले पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.