उपोषणकर्ता पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:45 PM2019-12-23T21:45:41+5:302019-12-23T21:50:03+5:30

पीडित मुलीच्या पित्याने सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वतः च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Father who are doing agitation attempted suicide | उपोषणकर्ता पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

उपोषणकर्ता पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसात दिवसांपासून लासलगावचे लोखंडे दांपत्य हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानपुढे उपोषणाला बसले आहेत. या घटनेने  जिल्हा रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

नाशिक : आपल्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांकडे करत संशयित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून लासलगावचे लोखंडे दांपत्य हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानपुढे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, पीडित मुलीच्या पित्याने सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वतः च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या या पित्याला तत्काळ जवळील रिक्षाचालकांनी उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका सरकारवाडा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी उपचार सुरू असताना आपात्कालीन कक्षातून पीडित मुलीच्या त्याने हाताची सलाईन काढून फेकत कक्षाबाहेर घेऊन भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी सुरक्षारक्षक व पोलिसांत कर्मचाऱ्यांनी वेळेस रोखल्याने पुन्हा त्यात त्या पित्यास उपचारासाठी कक्षात दाखल करण्यात आले. माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना पोलीस शिक्षा का करत नाही, असा सवाल या पित्याने उपस्थित केला आहे. संशयित आरोपींकडून वारंवार धमकावले जात असल्याचेही यावेळी त्याने जोरात ओरडून सांगितले. दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असून पीडित कुटुंबीयांकडून ज्या संशयितांची नावे सांगितली जातात. त्यांच्याविरुद्ध अद्याप कुठलेही सबळ पुरावे मिळून शकल्यामुळे त्यांना अटक केलेली नाही. मात्र, या गुन्ह्याचा तपास सुरू आहे असे पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले कुटुंबीयांना वारंवार समजूत काढून त्यांना दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन  उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली होती असेही सिंह म्हणाल्या. दरम्यान, या घटनेने  जिल्हा रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

Web Title: Father who are doing agitation attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.