आधी पत्नीसोबत भांडला, नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:00 IST2022-12-17T15:59:45+5:302022-12-17T16:00:37+5:30

वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

father throws 2 year old son 21 feet down from balcony after quarrel with wife jumps himself in delhi | आधी पत्नीसोबत भांडला, नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली!

आधी पत्नीसोबत भांडला, नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली!

नवी दिल्ली : पत्नीशी भांडण झाल्यानंतर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 3 मजली इमारतीच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारली. ही घटना दिल्लीतील कालकाजी भागातील आहे. वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, मानसिंग आणि त्याची पत्नी पूजा गेल्या काही महिन्यांपासून वादानंतर वेगळे राहत होते. पूजा सध्या तिच्या दोन मुलांसह कालकाजी येथे आजीच्या घरी राहत होती. काल रात्री मानसिंग पत्नी आणि मुलांना भेटायला आला असता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर रागाच्या भरात मानसिंगने आपल्या मुलाला बाल्कनीत नेले आणि त्याला 21 फूट खाली काँक्रीटवर फेकले आणि नंतर स्वत: उडी मारली, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, रुग्णालयात दाखल केलेल्या मानसिंगची प्रकृती सध्या स्थिर आहे, तर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मानसिंग दारूच्या नशेत असल्याचा आरोप पूजाच्या आजीने केला आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, मानसिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षिकेकडून मुलीवर जीवघेणा हल्ला, शाळेच्या बाल्कनीतून खाली फेकले
दुसरीकडे, या घटनेच्या एक दिवसापूर्वी राणी झाशी रोडवरील मॉडेल बस्ती येथे असलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावरून एका महिला शिक्षिकेने एका विद्यार्थिनीला खाली फेकले होते. तसेच, तिने आधी वर्गाचे दार बंद करून विद्यार्थिनीच्या डोक्यात कात्रीने अनेक वार केले होते. दरम्यान, या जखमी विद्यार्थिनीला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाडा हिंदूराव रुग्णालयात दाखल केले, जिथे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसेच,देशबंधू गुप्ता रोड पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिका गीता देसवाल विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. मुलीला फेकल्यानंतर तिने शाळेच्या प्रभारीलाही जखमी केल्याची माहिती आहे.

Web Title: father throws 2 year old son 21 feet down from balcony after quarrel with wife jumps himself in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.