राजस्थानच्या जालोरमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला लाजवेल अशी असे प्रकरण समोर आले आहे. येथे एका वडिलावर त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर मुलीच्या भावाला वडिलांच्या दुष्कर्माची माहिती मिळताच त्याने आत्महत्या केली. आरोपी वडील अद्याप फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये, अल्पवयीन तिच्या मावशीला तिच्या वडिलांच्या दुष्कर्माबद्दल माहिती देत होती. तो व्हिडीओ भावाने ऐकला आणि आत्महत्या केली.आरोपी वडील फरारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन भावाने सांचोर येथील नर्मदा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. त्याचवेळी पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो पळून गेला. मात्र, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर, अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की, एकदा तिच्या वडिलांनी तिला मोबाईल मिळवून देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तथापि, या ऑडिओ क्लिपमध्ये हे स्पष्ट नाही की, ही घटना अल्पवयीन मुलासोबत कधी घडली. मुलीने सांगितले की, जेव्हा तिच्या आईने तिच्या वडिलांना तिच्या भावाला सोबत घेण्यास सांगितले. तेव्हा आरोपी वडीलने नकार दिला.अल्पवयीन मुलीने आरोप केला होता की, झोपेत असताना तिच्या वडिलांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. ऑडिओमध्ये, अल्पवयीनाने आरोप केला की, तिला वडील एकट्यास घराबाहेर पडू देत नाहीत किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी बोलण्याची परवानगी देत नाही. मुलीने सांगितले की, जेव्हा तिने तिच्या आईला तिच्या वडिलांच्या अत्याचाराबद्दल सांगितले तेव्हा तिने तिला फटकारले देखील होते.
बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलाला ही करतूद कळताच संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 22:01 IST
Rape And Suicide : एवढेच नाही तर मुलीच्या भावाला वडिलांच्या दुष्कर्माची माहिती मिळताच त्याने आत्महत्या केली. आरोपी वडील अद्याप फरार आहेत.
बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलाला ही करतूद कळताच संपवले आयुष्य
ठळक मुद्दे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे