नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:42 IST2024-09-20T18:36:44+5:302024-09-20T18:42:35+5:30

एका ३० वर्षीय व्यक्तीला मुलगा हवा होता. पण त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला.

father killed his newborn daughter by throwing her on ground | नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल

नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदात्यानेच आपल्या नवजात मुलीला जमिनीवर फेकून मारल्याची खळबळजनक घटना घडली. चौथी मुलगी जन्मल्याचा राग मनात धरून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आधीच तीन मुली आहेत, जेव्हा त्याच्या पत्नीला चौथी मुलगी झाली तेव्हा त्याने रागाच्या भरात बाळाचा जीव घेतला. 

रिपोर्टनुसार, एका ३० वर्षीय व्यक्तीला मुलगा हवा होता. पण त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. यानंतर त्या व्यक्तीने संतप्त होऊन नवजात मुलीला जमिनीवर फेकून तिची हत्या केली. इटावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येप्रकरणी बबलू दिवाकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने हे हिंसक कृत्य केलं तेव्हा तो दारूच्या नशेत होता.

या प्रकरणी इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) संजय कुमार वर्मा यांनी सांगितलं की, आपल्या मुलीच्या जन्मानंतर तो नाराज झाला. तो प्रचंड संतापला होता. बबलूला पहिल्या पत्नीपासून मुली होत्या. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पुन्हा लग्न केलं. पण दुसऱ्या पत्नीपासूनही मुलगी होती.

एसएसपी यांनी सांगितलं की, बबलूला काही दिवसांपूर्वी चौथी मुलगी झाली. आई-वडिलांशी वाद सुरू असताना मद्यधुंद बबलूने पत्नीच्या मांडीवर असलेली मुलगी हिसकावून घेतली आणि तिला जमिनीवर फेकलं. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: father killed his newborn daughter by throwing her on ground