सासऱ्याचा सुनेवर बलात्कार; नवऱ्याकडे मांडली व्यथा पण तो काहीच बोलला नाही, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 19:36 IST2022-04-08T19:27:56+5:302022-04-08T19:36:48+5:30

Rape Case : दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला सासऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती

Father-in-law raped; Grief to husband but he didn't say anything, then ... | सासऱ्याचा सुनेवर बलात्कार; नवऱ्याकडे मांडली व्यथा पण तो काहीच बोलला नाही, मग...

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार; नवऱ्याकडे मांडली व्यथा पण तो काहीच बोलला नाही, मग...

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये एका वृद्धावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांवर त्याच्या मुलाच्या पत्नीने म्हणजेच सुनेने बलात्काराचा आरोप केला आहे. रात्री उशिरा, दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला सासऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तिने चौकशीदरम्यान आपली आपबिती सांगितली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत महिला स्टेशन प्रभारी सुषमा श्रीवास्तव यांनी सांगितले की, पीडितेच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर वर्षभरापर्यंत सर्व काही ठीक होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्या लोकांनी काही दिवसांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली आणि एक दिवस तिच्यावर बलात्कार केला.

ही बाब पीडितेने पतीलाही सांगितली होती. मात्र, पतीने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने तिच्या पालकांसह महिला पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी आज पोलिसांनी सासऱ्याविरोधात महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महिला पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Father-in-law raped; Grief to husband but he didn't say anything, then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.