धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:29 IST2020-03-17T13:27:55+5:302020-03-17T13:29:40+5:30
मध्य प्रदेशच्या सागरमध्ये त्याची सासुरवाड आहे.

धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला
हमीरपूर : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्या्मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने पत्नी माहेरी गेल्यानंतर दोन निष्पाप मुलांना गळफास लावून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेतला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हमीरपूरच्या मौदहा पोलिस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. मजरे अलीपूरा येथील रहिवासी अमरसिंह याने सोमवारी रात्री त्याचा 7 वर्षांचा मुलगा प्रांशू आणि 4 वर्षांची मुलगी प्रांशी यांना गळफास लावला. अमरसिंहने संक्रांतीच्या दिवशी पत्नीला माहेरी सोडले होते. मध्य प्रदेशच्या सागरमध्ये त्याची सासुरवाड आहे. त्याच्याकडे केवळ तीन गुंठे जमीन असल्याने तो हॉटेलमध्ये काम करत होता.
शेजाऱ्यांनी सांगितले की, त्याला दारुचे व्यसन होते. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्याचे पत्नीसोबत रोज भांडण होत होते. तरीही एवढे टोकाचे पाऊल उचलण्यामागच्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत. एसपी आणि एएसपी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.