वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:01 IST2026-01-27T19:00:52+5:302026-01-27T19:01:39+5:30

चंडीगड पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) शहरात ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे.

father commandant mother superintendent and son arrested for drugs in chandigarh | वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल

AI फोटो

चंडीगड पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) शहरात ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून १०.१ ग्रॅम 'आइस' (मेथम्फेटामाइन) जप्त करण्यात आलं असून चौकशीदरम्यान त्याने आपण ITBP (इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुलगा असल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील सध्या आसाममध्ये ITBP मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत आहेत, तर त्याची आई नोएडा येथे याच दलात सुपरिटेंडेंट पदावर तैनात आहे. या तरुणाविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अद्याप त्याच्या पालकांना या अटकेची माहिती दिलेली नाही. यामागे मोठं ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव अभिषेक चंदेल (रा. बटलाना, झिरकपूर) असं आहे. अभिषेक चंडीगडमध्ये ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी आला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ANTF आता त्याच्या नेटवर्कची चौकशी करत असून हा अमली पदार्थांचा साठा त्याने कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक त्याच्या आय-२० (i20) कारमधून ड्रग्ज देण्यासाठी येणार होता. यामुळे पोलिसांनी सेक्टर २८ आणि परिसरात सापळा रचला होता. तपासणी दरम्यान एका संशयास्पद कारला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडलं. झडती घेतली असता त्याच्याकडे १०.१ ग्रॅम 'आइस' सापडलं. 
 

Web Title : आईटीबीपी अधिकारी का बेटा चंडीगढ़ में ड्रग्स सप्लाई करते गिरफ्तार

Web Summary : चंडीगढ़ पुलिस ने ड्रग्स सप्लाई करते हुए एक आईटीबीपी अधिकारी के बेटे को गिरफ्तार किया। आरोपी अभिषेक चंदेल के पास से 10.1 ग्राम 'आइस' (मेथम्फेटामाइन) बरामद हुई। उसके पिता असम में असिस्टेंट कमांडेंट और मां नोएडा में सुपरिटेंडेंट हैं। एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज, जांच जारी।

Web Title : ITBP Officer's Son Arrested for Drug Supply in Chandigarh

Web Summary : Chandigarh police arrested an ITBP officer's son for supplying drugs. The accused, Abhishek Chandel, possessed 10.1 grams of 'ice' (methamphetamine). His father is an Assistant Commandant in Assam, and his mother is a Superintendent in Noida. A NDPS case has been registered, and investigation is underway.