झोपेत असताना नवविवाहित लेकीवर बापाने केला बलात्काराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:09 IST2021-08-11T16:07:47+5:302021-08-11T16:09:00+5:30
Attempting to rape : घरात झोपेत असताना बापाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

झोपेत असताना नवविवाहित लेकीवर बापाने केला बलात्काराचा प्रयत्न
नवी दिल्ली - पोटच्या नवविवाहित मुलीवर बापाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात सोमवारी ही लज्जास्पद घटना घडली. आरोपी बापाच्या लेकीचे नुकतंच लग्न झालं होतं आणि आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली होती. घरात झोपेत असताना बापाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घऱात झोपलेली असताना आरोपी वडील मद्यप्राशन करुन आले होते. यावेळी त्याने चुकीच्या पद्धतीने विवाहित आपल्या पोटच्या मुलीला स्पर्श केला. तसेच मुलीला आरडाओरडा न करण्यास धमकावलं. मात्र, मुलीने आरडाओरडा करत आपल्या आईला झोपेतून उठवलं.
पीडित मुलीने पोलिसांना माहिती देताना याअगोदर आपल्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले असून त्याबाबत वाच्यता केली नव्हती असं तिने सांगितले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक केली तेव्हा त्याने मद्यप्राशन केले होते. त्याच्या पत्नी आणि मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. पीडित मुलीचे नुकतेच दूरच्या नातेवाईकाशी लग्न झाले होते. आता आम्ही तिचे भारतीय दंड संहिता [IPC] कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर करू. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले, " अशी पोलिसांनी माहिती दिली.