क्रूरतेचा कळस! तरुणीचं अपहरण करून बलात्कार केला, गंभीर अवस्थेत रुग्णालयाबाहेर फेकून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:45 IST2021-10-13T16:37:17+5:302021-10-13T16:45:21+5:30

Crime News : तरुणीने आरोपीला विरोध केला असात तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

fatehpur woman alleged rape after kidnapping thrown at hospital gate in serious condition | क्रूरतेचा कळस! तरुणीचं अपहरण करून बलात्कार केला, गंभीर अवस्थेत रुग्णालयाबाहेर फेकून दिलं

क्रूरतेचा कळस! तरुणीचं अपहरण करून बलात्कार केला, गंभीर अवस्थेत रुग्णालयाबाहेर फेकून दिलं

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. तरुणीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयाबाहेर फेकून देण्यात आलं. तरुणीने आरोपीला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर फेकल्यानंतर तरुणी कशीबशी रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचली आणि तिने हा धक्कादायक प्रकार डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेने आपल्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला असून याबाबत आता अधिक तपास सुरू आहे. तरुणी हथगाम पोलीस ठाण्याच्या परिसरात राहते. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची एक छोटीशी पान टपरी आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता महराज पंडित नावाची एक व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तिला घेऊन निघून गेली. 

पीडितेने विरोध केला असता तिला बेदम मारहाण

आरोपीने आपल्या पत्नीला दुर्गा पुजेसाठी घराबाहेर पाठवलं आणि तरुणीवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री आरोपीने जवळपास अकरा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळ तिला फेकून दिलं आणि तो फरार झाला. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: fatehpur woman alleged rape after kidnapping thrown at hospital gate in serious condition