A fatal attack on his brother with a rickshaw driver due to refusing passenger | भाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला
भाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देभाडे घेऊन जाण्यास नकार दिल्यावर चार जणांच्या टोळक्याने राग मनात ठेवून रिक्षाचालक आणि त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केला जखमी रिक्षाचालक आणि त्याचा भाऊ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले

नालासोपारा - पूर्वेकडील परिसरातील रिक्षा चालकाने भाडे घेऊन जाण्यास नकार दिल्यावर चार जणांच्या टोळक्याने राग मनात ठेवून रिक्षाचालक आणि त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. जखमी रिक्षाचालक आणि त्याचा भाऊ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी जबाब घेऊन आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमधील रश्मी गार्डन बिल्डिंगच्या सदनिका नंबर 202 मध्ये राहणारा आणि व्यवसायाने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा किरण उद्धव राठोड (25) आणि त्याचा भाऊ करण हे दोघे रिक्षाने जात असताना शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरातील रवी बिडलान, शेखर अण्णा, बबलु आणि एक अनोळखी असे चौघे भाडे घेऊन जाण्यास सांगितले पण किरणने नकार दिल्यावर चौघांनी आपआपसात संगनमत करून व रागाच्या भरात चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. जखमी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.  


Web Title: A fatal attack on his brother with a rickshaw driver due to refusing passenger
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.