खळबळजनक! "निळ्या ड्रममध्ये १५ तुकडे..."; चिमुकलीचा फोन येताच पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:29 IST2025-04-12T13:28:36+5:302025-04-12T13:29:18+5:30
बालीपूर गावातून आलेल्या एका धक्कादायक कॉलने यूपी पोलीस हादरले.

खळबळजनक! "निळ्या ड्रममध्ये १५ तुकडे..."; चिमुकलीचा फोन येताच पोलीस हादरले
उत्तर प्रदेशच्या कमलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बालीपूर गावातून आलेल्या एका धक्कादायक कॉलने यूपी पोलीस हादरले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, कोणीतरी ११२ वर फोन करून माहिती दिली की, एका महिलेची हत्या करण्यात आली आहे आणि तिच्या मृतदेहाचे १५ तुकडे करून ते एका निळ्या ड्रममध्ये टाकून सिमेंटने बंद करण्यात आले आहे.
लोकेशन केले ट्रॅक
फोन येताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. इन्स्पेक्टर राजीव कुमार पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण गावाची झडती घेण्यात आली, पण कुठेही हत्येचा पुरावा सापडला नाही.पोलिसांनी कॉल करणाऱ्याचा सीडीआर काढून लोकेशन ट्रॅक केले. तपासात असं दिसून समोर आलं की, हा कॉल फतेहगड कोतवाली परिसरातील याकुतगंज चौकीजवळील एका गावातून करण्यात आला होता. सफाई कर्मचारी उत्तम कुमार याचा हा फोन नंबर होता.
१० वर्षांच्या मुलीने केलेला फोन
पोलिसांनी तपास केला तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. हा फोन उत्तम कुमारच्या १० वर्षांच्या मुलीने केला होता. तिने सांगितले की ती घरी एकटी होती आणि तिने YouTube वर एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ड्रममध्ये बंद केल्याचा व्हिडीओ पाहिला होता. याच भीतीपोटी तिने पोलिसांना हा खोटा फोन केला. मुलीच्या आईने सांगितले की, संपूर्ण कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेलं होतं. याच दरम्यान मुलीने फोन केला.
पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, परंतु या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल रेकॉर्डिंग देखील तपासले जात आहे जेणेकरून कॉल एखाद्या मोठ्या व्यक्तीने केला आहे की नाही याची खात्री होईल. सध्या पोलीस मुलीला आणि तिच्या कुटुंबाला अशी खोटी माहिती देणं किती गंभीर असू शकतं हे समजावून सांगत आहेत.