गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 13:53 IST2020-12-16T13:51:55+5:302020-12-16T13:53:17+5:30
Suicide : एरंडोल येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या
ठळक मुद्देहिंमत अजबसिंग पाटील (४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी ते गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेले आणि तिथेच त्यांनी गळफास घेतला.
एरंडोल जि. जळगाव : एका शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना कढोली ता.एरंडोल येथे बुधवारी सकाळी घडली ९ वाजता घडली.
हिंमत अजबसिंग पाटील (४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी ते गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेले आणि तिथेच त्यांनी गळफास घेतला.
त्यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.