Farmer Suicide : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:02 IST2021-12-13T21:02:29+5:302021-12-13T21:02:48+5:30
Suicide Case : अशोक एकनाथ लांडगे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer Suicide : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या
पाचोरा : नापिकी आणि डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सातगाव डोंगरी ता.पाचोरा येथे घडली.
अशोक एकनाथ लांडगे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. लांडगे यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ७७ हजार रुपये तर पत्नीच्या नावे बचत गटाचे ९० हजार रुपये कर्ज होते. शेतात नापिक होती तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी , या विवचंनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.