कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेउन शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 18:23 IST2021-05-28T18:22:31+5:302021-05-28T18:23:48+5:30

Suicide Case : प्राथमिक तपास एपीआय अनिल कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Farmer commits suicide by jumping into a well due to debt bondage | कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेउन शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेउन शेतकऱ्याची आत्महत्या

ठळक मुद्देलालाजी रामाजी राेहनकर (५३) रा.हळदा असे मृतकाचे नाव आहे.

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :ब्रम्हपुरी तालुक्यातील बाेडधा शिवारातील विहिरीत एका शेतकऱ्याने उडी घेउन आत्महत्या केली. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

लालाजी रामाजी राेहनकर (५३) रा.हळदा असे मृतकाचे नाव आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील लालाजी रोहनकर हा वडीलाेपार्जित शेती करून माेलमजुरी करीत हाेता. मात्र, शेतातील उत्पन्न मागील दोन वर्षापासून बरोबर येत नसल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. घटनेच्या दिवशी दुपारी तो घराबाहेर पडला व बाेडधा शिवारातील स्वमालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठविला. प्राथमिक तपास एपीआय अनिल कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Farmer commits suicide by jumping into a well due to debt bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.