शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"१० मिनिटांत येतो...", आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस पण लेक आलाच नाही; खड्ड्याने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:29 IST

२५ वर्षीय कमल ध्यानी याचा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली प्रशासनाने खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला.

दिल्लीच्या जनकपुरी भागात झालेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. २५ वर्षीय कमल ध्यानी याचा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली प्रशासनाने खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आणि त्याची बाईक खड्ड्यात पडलेली आढळली. अपघाताच्या काही वेळ आधी कमलने आपल्या आई-वडिलांना फोन करून सांगितलं होतं की, तो अवघ्या १० मिनिटांत घरी पोहोचत आहे. 

कमलने शुक्रवारी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कामावरून सुटी घेतली होती. घरात कीर्तनाची तयारी सुरू होती आणि एका छोट्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबीय रात्रभर जागं राहून केकसह त्याची वाट पाहत होते, पण तो आलाच नाही. मित्र अल्ताफ आलमने एनडीटीव्हीला (NDTV) सांगितलं की, कमलने फोनवर आपल्या कुटुंबीयांना सांगितले होतं की तो १० मिनिटांत पोहोचेल. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला.

उघड्या खड्ड्याने घेतला जीव 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता, तिथे लाईट नव्हती, ना कोणताही इशारा देणारा बोर्ड होता, ना बॅरिकेडिंग. आता ज्या ठिकाणी ग्रीन नेट (हिरवी जाळी) आणि बॅरिकेड्स दिसत आहेत, तिथे गुरुवारी रात्री काहीच नव्हतं. हा प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं जात आहे.

मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा"

कुटुंबीयांचा गंभीर आरोप

कमलच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याला शोधण्यासाठी सागरपूर, डाबरी, मंगोलपुरी, जनकपुरी, पालम आणि रोहिणी यासह एकूण सहा पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारल्या. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मदत केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर सकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी फोन करून एक मृतदेह सापडल्याचे सांगितलं. तो मृतदेह कमलचा होता.

दिल्लीच्या पालम भागात राहणारा २५ वर्षीय कमल एका खासगी बँकेत काम करत असे. त्याला खाण्याची खूप आवड होती. त्याचा मित्र अल्ताफने सांगितले की, तो अनेकदा मित्रांना घराशेजारी बिर्याणी आणि कॉफी पिण्यासाठी घेऊन जायचा. त्याचे वडील मंदिरात पुजारी आहेत. कमल हा घराचा मोठा आधार होता. या अपघातानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi: Man dies in pit on parents' anniversary; negligence alleged.

Web Summary : A 25-year-old man died in Delhi after falling into an uncovered pit dug by authorities. He was on his way home to celebrate his parents' anniversary. The family alleges negligence, stating the site lacked proper warnings. Police initially delayed assistance, further compounding their grief.
टॅग्स :delhiदिल्लीPotholeखड्डेDeathमृत्यूPoliceपोलिस