शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कोल्हापुरात १ लाख ८८ हजारांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 21:41 IST

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी चिक्कोडी येथील एक तरुण बनावट नोटा देण्यासाठी महागावला येणार  असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

राम मगदूम

गडहिंग्लज : बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना गडहिंग्लज पोलीसांनी महागाव येथील पाच रस्ता चौकात शनिवारी दुपारी सापळा रचून अटक केली.अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५,रा. मेहबूबनगर, चिक्कोडी जि.बेळगाव), अनिकेत शंकर हुले (वय २०,रा.महागाव,ता. गडहिंग्लज) संजय आनंदा वडर (वय ३५,सध्या रा. शिक्षक कॉलनी, नेसरी मुळगाव महागाव ) अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून मोटरसायकलीसह १ लाख ८८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.     पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी चिक्कोडी येथील एक तरुण बनावट नोटा देण्यासाठी महागावला येणार  असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी महागाव येथे  सापळा लावला होता. संशयित दोघेजण पाच रस्ता चौकात कांही अंतरावर रस्त्याच्या कडेला थांबले होते. दरम्यान, गडहिंग्लजकडुन मोटरसायकलवरुन ( केए २३-इ क्यू -९४८२)आलेला तरूणही 'त्या' दोघांजवळ जावून थांबला.त्यानंतर तिघांचीही हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी मोटरसायकल अडवून त्यांना ताब्यात घेतले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या. गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोळी, दादू खोत, दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 ५००,२००,१०० च्या नोटा!

अंगझडतीत अब्दुलरजाककडे   ५०० रुपयाच्या १३१ नोटा मिळून एकूण ६५५००,अनिकेतकडे २०० रुपयाच्या ३३५ नोटा मिळून ६७००० तर संजयकडे १०० रुपयाच्या ५६१ नोटा मिळून ५६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा पोलीसांना सापडल्या.

तिघेही मजूर,कोण सूत्रधार?

अब्दुलरजाक हा सेंट्रींगकाम करणारा, अनिकेत हा पेंटिंगकाम तर संजय गवंडीकाम करणारा मजूर आहे. झटपट श्रीमंतीच्या मोहापायीच ते याकडे वळले असण्याची शक्यता आहे.त्यामुळे या टोळीच्या खऱ्या सूत्रधारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस