चोरट्याने पळवली नकली सोनसाखळी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:49 IST2019-03-29T13:48:31+5:302019-03-29T13:49:27+5:30
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चोरट्याने पळवली नकली सोनसाखळी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
टिटवाळा - शहरातील हरिओम व्हॅली सोसायटीत राहणाऱ्या प्रभावती पाटील (४६) या गुरुवारी नातीला घेऊन जात असताना, दुचाकीने आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. मात्र, दुचाकीस्वाराने खेचून नेलेली सोनसाखळी नकली होती. दुचाकीस्वार गणेशनगर सोसायटीच्या दिशेने पळून गेला. महिलेची चेन नकली असली, तरी अशा प्रकारची घटना जिवावर बेतू शकते. त्यामुळे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.