शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा ते पाय... अनेक ओरखडे, जखमा; मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कारानंतर खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 08:56 IST

शुक्रवारी दुपारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या महिला डॉक्टरचा मृतदेह पाहिला आणि सर्वांना धक्का बसला.

कोलकाता : पश्चिम बंगालमधून धक्कादायक बातमी येत आहे. एका मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा नग्न अवस्थेत खून करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या महिला डॉक्टरचा मृतदेह पाहिला आणि सर्वांना धक्का बसला. नग्नावस्थेतील मृतदेहावर चेहऱ्यापासून ते पायापर्यंत अनेक जखमा होत्या. यामुळे कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ही घटना आहे. ही तरुणी दुसऱ्या वर्षाची पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी होती. चेस्ट मेडिसिन विभागात ती डॉक्टर म्हणून काम करत होती. आयसीयु विभाग असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ती मृत आढळली. 

महिला डॉक्टरचा अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने तिच्यासोबतच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरनी आंदोलन सुरु केले. यामुळे कोलकाता पोलिसांच्या उत्तर उपनगर विभागाचे उपायुक्त अभिषेक गुप्ता यांच्या नेतृत्वात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या महिला डॉक्टरच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. कपडे फाटलेले आहेत, अर्धनग्न अवस्थेत मृतदेह होता, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. 

तसेच संतापलेल्या डॉक्टरांनी १० तास धरणे आंदोलन, वादावादी केली. हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला. महिला डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीवर कॉलेज परिसरात बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. महाविद्यालय प्रशासन सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेनंतर ममता यांनी पालकांना फोन करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

या महिला डॉक्टरने रात्री २ वाजता आपल्या कनिष्ठ डॉक्टरांसोबत जेवण केले होते. विश्रांतीसाठी ती सेमिनार रुममध्ये गेली होती, असे तिच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितले. तर पोलिसांनी तिच्या मानेवर, गालावर, नाकावर आणि ओठांवर ओरखड्याच्या खुणा आहेत. यामुळे तिथे झटापट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी