कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 15:45 IST2021-01-03T15:43:11+5:302021-01-03T15:45:16+5:30
Cylinder Blast : या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरातील टेकडीवर एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. या घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी घर जळून खाक झाले आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाने धाव घेऊन लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या होत्या. हा परिसर टेकडीचा असल्याने अग्नीशमन दलाला आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरातील टेकडीवर एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. pic.twitter.com/eKT7DTNxoL
— Lokmat (@MiLOKMAT) January 3, 2021