Exciting! The body was found in a building under construction near Vashi police station | खळबळजनक! वाशी पोलीस ठाण्यालगतच्या समाजमंदिराच्या बांधकामात आढळला मृतदेह

खळबळजनक! वाशी पोलीस ठाण्यालगतच्या समाजमंदिराच्या बांधकामात आढळला मृतदेह

ठळक मुद्दे मृत व्यक्ती कामगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : वाशी पोलिसठाण्यालगत बांधकाम सुरु असलेल्या पालिकेच्या समाजमंदिरात मृतदेह आढळून आला. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून, हि हत्या आहे कि आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

वाशी सेक्टर 3 येथे पालिकेच्या वतीने चार मजली समाजमंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. वाशी पोलिसठाण्याला लागूनच हि इमारत आहे. सोमवारी संध्याकाळी त्याठिकाणी एक मृतदेह आढळून आला. इमारतीच्या तळमजल्यावरून दुर्गंधी येत असल्याचे कामगारांनी पोलिसांना कळवले होते. यावरून तिथे पाहणी केली असता  कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. लिफ्ट साठी बनवलेल्या जागेच्या ठिकाणी तळाशी खड्ड्यात हा मृतदेह पडलेला होता. परंतु मृत व्यक्ती तिथल्या कामगारांपैकी कोणी नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. परंतु बांधकामाच्या ठिकाणी कामगार व सुरक्षा रक्षक असतानाही अज्ञात व्यक्ती त्याठिकाणी आली कशी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच सदर व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे कि हत्या ? याचाही उलगडा झालेला नाही. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Exciting! The body was found in a building under construction near Vashi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.