खळबळजनक ! टॅक्सी विकण्यासाठी उबर चालकाची हत्या; तीन तुकडे करून फेकले नाल्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:53 PM2019-02-05T18:53:51+5:302019-02-05T18:56:23+5:30

आरोपी जोडप्याला गोविंदची टॅक्सी पळवून ती पश्चिम उत्तर प्रदेशात विकायची होती. त्यासाठी पती - पत्नीने गोविंदची हत्या केली.

Excited! The murder of a driver for selling a taxi; Three Pieces Nulled | खळबळजनक ! टॅक्सी विकण्यासाठी उबर चालकाची हत्या; तीन तुकडे करून फेकले नाल्यात 

खळबळजनक ! टॅक्सी विकण्यासाठी उबर चालकाची हत्या; तीन तुकडे करून फेकले नाल्यात 

Next
ठळक मुद्देराम गोविंद बेपत्ता झाल्यानंतर आठवडयाभराने पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी लोनी गाझियाबाद येथून जोडप्याला अटक केली. गाझियाबाद येथील घरी पोहोचल्यानंतर पती - पत्नीने गोविंदला त्यांच्या घरी नेले व त्याला चहा दिला. रात्री थंडी असल्यामुळे गोविंदही त्यांच्या घरी जाण्यास तयार झाला. त्यावेळी त्या पती - पत्नीने गोविंदचा दोरीने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गोविंदचा मृतदेह घरातच ठेवला व त्याची गाडी घेऊन मोरादाबाद येथे गेले.

नवी दिल्ली - एका जोडप्याने उबर चालकाची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते नाल्यात फेकून दिले. राम गोविंद असं मृत उबर टॅक्सी चालकाचे नाव आहे. आरोपी जोडप्याला गोविंदची टॅक्सी पळवून ती पश्चिम उत्तर प्रदेशात विकायची होती. त्यासाठी पती - पत्नीने गोविंदची हत्या केली.

राम गोविंद बेपत्ता झाल्यानंतर आठवडयाभराने पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी लोनी गाझियाबाद येथून जोडप्याला अटक केली. २९ जानेवारीला गोविंदने मदनगीर ते कापाशेरा अशी ट्रीप पूर्ण केल्यानंतर तो गाडीमध्ये थांबला होता. त्यावेळी रात्री एकच्या सुमारास फरहात अली आणि सीमा शर्मा यांनी त्याची कॅब बुक केली. गाझियाबाद येथील घरी पोहोचल्यानंतर पती - पत्नीने गोविंदला त्यांच्या घरी नेले व त्याला चहा दिला. रात्री थंडी असल्यामुळे गोविंदही त्यांच्या घरी जाण्यास तयार झाला. फरहात आणि सीमाने चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. चहा पिऊन गोविंद बेशुद्ध झाला होता. त्यावेळी त्या पती - पत्नीने गोविंदचा दोरीने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गोविंदचा मृतदेह घरातच ठेवला व त्याची गाडी घेऊन मोरादाबाद येथे गेले. त्यांनी तिथे एका मंदिराजवळ झुडूपात गाडी लपवून ठेवली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा घरी आले.

Web Title: Excited! The murder of a driver for selling a taxi; Three Pieces Nulled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.