शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पापाचे खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी सापडली; वर्धा-नागपूरच्या तज्ज्ञांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 8:14 AM

गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४  हाडे जप्त केली होती.

देऊरवाडा/आर्वी (जि. वर्धा) :  राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आर्वी येथील गर्भपात प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी करून  कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम केले. शुक्रवारी आणखी एक कवटी तपास पथकाच्या हाती लागली. 

या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४  हाडे जप्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता  नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स तसेच आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलिसांनीही कदम हॉस्पिटलच्या आत व बाहेर तपासणी केली.  

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे, पाेस्को सेलच्या   ज्योत्सना गिरी यांच्यासह मोठा पोलीस ताफा  उपस्थित होता. खबरदारी म्हणून तपासणी व चौकशीदरम्यान कुणालाही रुग्णालय परिसरात फिरकू देण्यात आले नाही. तपास पथकाने बायोगॅसचा टॅंक तसेच गडर टॅंकही स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हाताने तपासून घेतली. या तपासणीत मेडिकल बायोवेस्टसह वेगवेगळे संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

खोदकामात सुटली दुर्गंधी 

रुग्णालय परिसरात खोदकामादरम्यान प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या खड्ड्यात आणखी काही अवशेष सापडतात काय, हेदेखील तपासण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बायोगॅस खड्ड्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद : डाॅ. आशा मिरगे

अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने केला जात असला तरी या प्रकरणात आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पदच आहे. या प्रकरणात आरोग्य विभागातील कोण अधिकारी दोषी आहे, याचा शोध घेणे गरजेचे असून, या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण आरोग्यमंत्री, तसेच गृहमंत्र्यांकडे रेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पीसीपी एनडीटी मंडळाच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पत्रपरिषदेत दिली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र