शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गँगस्टर एजाज लकडावाला अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:33 IST

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई; बिहारमध्ये लकडावालाला अटक

मुंबई: गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिहारमधून बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अटकेत आसलेल्या एजाजची मुलगी शिफा उर्फ सोनियाच्या चौकशीमधून एजाजची माहिती मिळवत गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अंडरवर्ल्डमध्ये एकच खळबळ उडाली आहे.एजाज लकडावालाविरोधात मुंबई शहरात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे 25 गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध 80 पेक्षा अधिक तक्रारी आहेत. लकडावाला हा आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून खंडणीसाठी फोन करून धमकावत होता. तो दाऊद टोळीचा खास हस्तक होता. पुढे एजाजने दाऊदशी फारकत घेत, राजेंद्र सदाशीव निकाळजे उर्फ छोटा राजनच्या मदतीने आपली टोळी तयार केली. राजनसोबत राहून मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वित्झर्लंड आणि अरब देशांमध्ये त्याने आपले प्रस्थ निर्माण केले. 2002 साली बँकॉकमध्ये  एजाजवर छोटा शकीलच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्यावर एकूण 7 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. १९९२ ते २००८ पर्यंत एजाज छोटा राजन टोळीचा हस्तक म्हणून काम करत होता. टोळीमध्ये आर्थिक वाद झाल्यानंतर तो विभक्त झाला. त्यानंतर तो स्वतःची वेगळी टोळी चालवू लागला.गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. त्यात बनावट पासपोर्ट प्रकरणात एजाजची मुलगी शिफा शाहिद शेख उर्फ सोनियाला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीत एजाज बिहार येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बिहार पोलिसांच्या मदतीने 8 जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली. 

दाऊदपर्यंत पोहचणयाचा मार्गएजाजकडे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बरिचशी गोपनीय माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरु असल्याचेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

खंडणीच्या गुन्ह्यात भाऊ अटकेतगेल्या वर्षी मार्च महिन्यात व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी एजाजचा भाऊ अकील लकडावाला याला अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम