घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:43 IST2025-11-15T16:42:48+5:302025-11-15T16:43:30+5:30
रजाबुलने अविवाहित सांगून सईदाशी लग्न केले. पण, प्रत्यक्षात त्याचे आधीच दोन महिलांशी विवाह झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून पत्नीला तीन तलाक देऊन घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांशीराम नगरमध्ये राहणाऱ्या सईदा नावाच्या महिलेने तिचा पती रजाबुल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सईदाचा आरोप आहे की, मैनाठेरच्या तख्तपूर अल्लाह उर्फ नानपूर गावातील रहिवासी असलेल्या रजाबुलने स्वतःला अविवाहित सांगून तिच्याशी लग्न केले. प्रत्यक्षात त्याचे आधीच दोन महिलांशी विवाह झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत.
फसवणूक करून केले लग्न, विरोध केल्यावर दिला तीन तलाक
लग्नानंतर रजाबुलने सईदाला करूला येथे भाड्याच्या खोलीत ठेवले. जेव्हा सईदाला तिच्या पतीच्या मागील दोन विवाहांबद्दल माहिती मिळाली आणि तिने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा रजाबुलने तिला तीन तलाक देऊन घरातून हाकलून दिले. पीडितेचा आरोप आहे की, आरोपी आता चौथे लग्न करण्याच्या तयारीत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मागील दोन विवाह लपवले!
सईदाने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले की, पाच वर्षांपूर्वी तिचे रजाबुलशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्याने तिला करूला येथील भाड्याच्या घरात ठेवले होते. सईदाने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा सासरी गेली, तेव्हा तिला रजाबुलच्या भूतकाळाबद्दल कळले. आरोपीने पहिले लग्न एका हिंदू मुलीशी केले होते, तिला सोडल्यानंतर त्याने दुसऱ्या एका तरुणीशी लग्न केले, जिच्यापासून त्याला दोन मुले आहेत.
आता चौथीच्या तयारीत होता पती!
आरोपीने त्या दुसऱ्या पत्नीलाही सोडून दिले होते आणि नंतर स्वतःला अविवाहित सांगून फसवणूक करून सईदाशी तिसरे लग्न केले. सईदाला लग्नानंतरच कळले की, ती त्याची तिसरी पत्नी आहे.
पीडितेचा आरोप आहे की, पती रजाबुल आधीच दोन विवाह करून , आता तिला सोडून आता चौथ्या तरुणीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. जेव्हा सईदाने पतीच्या या वर्तनाला आणि मागील विवाहांचा विरोध केला, तेव्हा रजाबुलने तिला मारहाण केली.
सईदाच्या आरोपानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी रजाबुलने तिला तीन तलाक देऊन घरातून बाहेर काढले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मझोला पोलीस ठाण्यात आरोपी पती रजाबुलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.