पोलिसांनाही विश्वास बसेना! वासनांध मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्काराचा प्रयत्न, कशीबशी कपडे सावरत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 21:25 IST2025-04-01T21:24:33+5:302025-04-01T21:25:05+5:30

महिलेने आपल्या पोटच्या मुलाविरोधात अशी तक्रार केल्याने पोलिसही सुरुवातीला हादरले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला अटक केली आहे. 

Even the police couldn't believe it! A lustful boy tried to rape his own biological mother, somehow managed to save her clothes... | पोलिसांनाही विश्वास बसेना! वासनांध मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्काराचा प्रयत्न, कशीबशी कपडे सावरत...

पोलिसांनाही विश्वास बसेना! वासनांध मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्काराचा प्रयत्न, कशीबशी कपडे सावरत...

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात आई आणि मुलाच्या नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडली आहे. नशेत असलेल्या वासनांध मुलाने ज्या महिलेने जन्म दिला तिचीच इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला आहे. कसेबसे अंगावरील अस्ताव्यस्त झालेले कपडे सावरत या महिलेने आपली सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. स्वत:च्याच आईवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचे कारनामे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. 

महिलेने आपल्या पोटच्या मुलाविरोधात अशी तक्रार केल्याने पोलिसही सुरुवातीला हादरले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला अटक केली आहे. 

शनिवारी रात्रीची ही घटना आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने त्याच्या जन्मदात्या आईवरच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर तो बळजबरी करू लागला. वासनांध झालेल्या या मुलाला आपण काय करतोय याचेही भान राहिले नाही. तिने त्याला प्रतिकार करून स्वत:ची सुटका करून घेतली. आई आणि मुलाचे हे प्रकरण असल्याने पोलिसांनाही या तक्रारीचे आश्चर्य वाटले होते. 

पोलिसांना असे काही घडले असेल असा विश्वास न बसल्याने त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते. तपासात खरे समोर आल्याने राहुल नावाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुलला दारुचे व्यसन लागले आहे आणि तो काहीही करू शकतो, यामुळे त्याच्या आईच्या तक्रारीवरून आम्ही त्याला तुरुंगात पाठविले असल्याचे पोलीस निरीक्षक परमहंस तिवारी यांनी सांगितले. 

Web Title: Even the police couldn't believe it! A lustful boy tried to rape his own biological mother, somehow managed to save her clothes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.