पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एन्ट्री; पुणे पोलिसांकडून मागवला तपासाचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 21:53 IST2021-02-16T21:51:34+5:302021-02-16T21:53:36+5:30
Pooja Chavan Case : राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठ्वण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एन्ट्री; पुणे पोलिसांकडून मागवला तपासाचा अहवाल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यामुळे भाजपा नेते खूप आक्रमक झाले आहेत. दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने पुणेपोलिसांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात आता इंट्री केल्याचं स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठ्वण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी पुणे पोलिसांचं तपास काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे.