कोहिनूर मिल गैरव्यवहार: उन्मेष जोशींसह राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:42 PM2019-08-20T14:42:13+5:302019-08-20T14:56:19+5:30

काल आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

Enquiry going on of Rajn Shirodkar along with Umesh Joshi in connection with Kohinoor mill financial misconduct | कोहिनूर मिल गैरव्यवहार: उन्मेष जोशींसह राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी

कोहिनूर मिल गैरव्यवहार: उन्मेष जोशींसह राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी

Next
ठळक मुद्देआज देखील उन्मेष जोशी यांच्यासह राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची ईडी कार्यालयात एकत्र चौकशी सुरू आहे. कालांतराने राज यांनी या कंपनीतून माघार घेत आपले समभागही विकून टाकले होते.

मुंबई - सध्या मुंबईत गाजत असलेले कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याचे चिरंजीव उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर काल आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. आज देखील उन्मेष जोशी यांच्यासह राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची ईडी कार्यालयात एकत्र चौकशी सुरू आहे. 

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस’ने (आयएल अँड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ‘आयएल अँड एफएस’कडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्जप्रकरणात राज यांच्या सहभागाबाबतची ईडी चौकशी  करत आहे. दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, कालांतराने राज यांनी या कंपनीतून माघार घेत आपले समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे.

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उन्मेष जोशींची 8 तास चौकशी 

Web Title: Enquiry going on of Rajn Shirodkar along with Umesh Joshi in connection with Kohinoor mill financial misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.