इंजिनिअर बॉयफ्रेन्डचं कर्ज फेडण्यासाठी चोर बनली गर्लफ्रेन्ड, पण एका चुकीने गेले दोघेही तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:48 PM2022-05-03T15:48:48+5:302022-05-03T15:51:19+5:30

Tamil Nadu Crime News : पीडित महिलेने लगेच याची तक्रार पोलिसांकडे दिली आणि सांगितलं की, दोन आरोपींनी तिची ४४ ग्रॅमची चेन पळवली आणि फरार झाले.

Engineer students caught for chain snatching from an elderly woman Kaliyammal from Thondamuthur Coimbatore Tamil Nadu | इंजिनिअर बॉयफ्रेन्डचं कर्ज फेडण्यासाठी चोर बनली गर्लफ्रेन्ड, पण एका चुकीने गेले दोघेही तुरूंगात

इंजिनिअर बॉयफ्रेन्डचं कर्ज फेडण्यासाठी चोर बनली गर्लफ्रेन्ड, पण एका चुकीने गेले दोघेही तुरूंगात

Next

Tamil Nadu Crime News :  तामिळनाडूच्या थोंडामुथुरमध्ये वयोवृद्ध महिलेची लूट करणाऱ्या इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही बकरी चारायला नेणाऱ्या एका महिलेची गोल्ड चेन चोरी केल्याचा आरोप आहे. कलियम्मल भागात एक महिला जेव्हा रोडवर आपल्या बकऱ्यांना चारा खाऊ घालत होती तेव्हा तिच्याजवळ दोन बाइकस्वार थांबले. दोघांनीही महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. महिला त्यांना पत्ता सांगत असतानाच संधी मिळताच बाइकस्वारांनी महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि फरार झाले.

पीडित महिलेने लगेच याची तक्रार पोलिसांकडे दिली आणि सांगितलं की, दोन आरोपींनी तिची ४४ ग्रॅमची चेन पळवली आणि फरार झाले. पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. ज्याद्वारे आरोपींची ओळख पटवली गेली.

गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून आरोपींची ओळख पटवली गेली आणि पोलिसांना दोघांनाही अटक केली. आरोपींची ओळख २० वर्षी प्रसाद आणि त्याच वयाची तेजस्विनी अशी पटली. दोघेही सोमैयापालयममधील एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये बीटेकच्या थर्ड इअरला शिकत आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्ड आहेत. दोघेही चांगल्या परिवारातून आलेले आहेत. पण प्रसादला ऑनलाइन जुगाराची वाईट सवय आहे. ज्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. हे कर्ज फेडण्यासाठी दोघांनी चेन स्नॅचिंगसारखं कृत्य केलं.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी प्रसादच्या कुटुंबियांनी एकदा घरातून २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांना नंतर समजलं होतं की, चोरी त्यांच्या मुलानेच केली आहे. त्यामुळे त्यांनी केस मागे घेतली होती.
 

Web Title: Engineer students caught for chain snatching from an elderly woman Kaliyammal from Thondamuthur Coimbatore Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.