धक्कादायक! इंजिनिअर पती पत्नीसमोरच गर्लफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवायचा,दोघींनी मिळून उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:25 IST2025-01-13T18:19:20+5:302025-01-13T18:25:28+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १२ जानेवारी रोजी एका इंजिनिअरची दोन महिलांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले.

धक्कादायक! इंजिनिअर पती पत्नीसमोरच गर्लफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवायचा,दोघींनी मिळून उचलले टोकाचे पाऊल
उत्तर प्रदेशमधील इटावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटावा येथे १२ जानेवारी रोजी एका इंजिनिअरचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला, तपासात पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून प्रेयसीचा शोध सुरू केला आहे. पती पत्नीसमोरच प्रेयसीसोबत संबंध ठेवत होता असा आरोप पत्नीने केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना इटाला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स परिसरात घडली. अभियंता राघवेंद्र यांची हत्या त्यांची पत्नी आणि प्रेयसीने ११ जानेवारी रोजी केली होती. त्यानंतर अनेक प्रकारच्या कथा रचल्या गेल्या पण पोलीस तपासात सर्व काही उघड झाले. नवी दिल्लीतील जिंदाल शॉप कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय राघवेंद्र यादव यांची डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर, मृतदेह रजाईत गुंडाळून आग लावण्यात आली.
घरात धूर येताच, शेजारच्या महिलेने डायल ११२ ला कळवले. त्या आधारे, फॉरेन्सिक टीम व्यतिरिक्त, पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी देखील तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान, राघवेंद्र यादवची पत्नी किरण यादव आणि राघवेंद्रची प्रेयसी वर्षा यांनी मिळून हत्येनंतर मृतदेह जाळून टाकला. जेव्हा पोलिस अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा राघवेंद्रच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. पत्नी घटनेबाबत पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगत होती. तिच्या पतीची हत्या कोणी केली आणि पळून गेले हे तिला माहित नाही, असं ती सांगत होती.
या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी चार पोलिस पथके तयार केली होती. १२ जानेवारी रोजी अभियंता राघवेंद्र यांचा मुलगा प्रिन्स यादव याने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याच्या आईने त्याच्या वडिलांची हत्या केली असल्याचा आरोप केला. सिव्हिल लाईन पोलिसांनी राघवेंद्रची पत्नी किरण यादव हिच्या हत्येत वापरलेला लोखंडी मुसळ मोतीझील चौकाजवळून जप्त केला आहे. पत्नीने राघवेंद्र वागायला चांगला नव्हता असा आरोप केला आहे. तो त्याच्या पत्नीसमोर त्याच्या प्रेयसीशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि तिला ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर त्याची पत्नी आणि प्रेयसीने मिळून त्याची हत्या केली असल्याचे उघड झाले.