पाच महिने पगार थांबवला म्हणून कर्मचाऱ्याने केली वेबसाईट हॅक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:55 IST2019-04-05T07:54:16+5:302019-04-05T07:55:08+5:30

कंपनीला धडा शिकविण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीचे व्यवहार सुरु असलेल्या वेबसाईट हॅक केल्याची घटना उघडकीस आली आहे

Employee's hacked company website due to company stops his five months salary | पाच महिने पगार थांबवला म्हणून कर्मचाऱ्याने केली वेबसाईट हॅक 

पाच महिने पगार थांबवला म्हणून कर्मचाऱ्याने केली वेबसाईट हॅक 

मुंबई - कंपनीने पाच महिने पगार थकविला, त्यात नोकरी सोडल्यानंतर कायदेशीर मार्गाने पगार मिळवलाही, मात्र कंपनीला धडा शिकविण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीचे व्यवहार सुरु असलेल्या वेबसाईट हॅक केल्याची घटना उघडकीस आली आहे. माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुन्हा नोंद झाला असून पोलिसांच्या चौकशीत ही माहिती समोर आली. 

गुजरातमधून माटुंगा पोलिसांनी या कर्मचाऱ्याला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. दीपेश बुधभट्टी असे आरोपीचे नाव आहे. माटुंगा परिसरात असलेल्या तक्रारदार कंपनीचे गुजरातमध्येही एक युनिट आहे. तेथे दीपेश नोकरीला होता. एका संकेतस्थळावरुन कंपनीचे आर्थिक व्यवहार सुरु होते. याची माहिती दीपेशला मिळाली. गेल्या वर्षी कंपनीने त्याचा पाच महिन्यांचा पगार थकविला होता. त्याने नोकरी सोडून कायदेशीर मार्गाने हा पगार मिळवला. मात्र कंपनीने पगार थकविल्याचा राग मनामध्ये असलेल्या दीपेशने कंपनीना धडा शिकविण्यासाठी 23 मार्च ते 1 ऑगस्टदरम्यान कंपनीच्या दोन्ही वेबसाईट हॅक केल्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. 

18 ऑगस्ट 2018 रोजी कंपनीकडून माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासाअंती चौकशीदरम्यान दीपेश या कंपनीच्या आधीच्या कर्मचाऱ्यानेच ही वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला. दीपेशने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 
 

Web Title: Employee's hacked company website due to company stops his five months salary