शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:13 IST

ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे.

ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी जाळून मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. निक्कीच्या माहेरचे लोक ही हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा आरोप करत आहेत, तर सासरच्या मंडळींनी तिने स्वतःला जाळून घेतल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असतानाच, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर ही हत्याच होती, तर निक्कीच्या माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी सासरच्यांना का दिला? आणि दोन्ही कुटुंबं अंतिम संस्कारापर्यंत शांत का होती?

या प्रकरणाला नवा ट्विस्ट देणारी एक बाब आता समोर आली आहे. आरोपी विपिन भाटीच्या शेजाऱ्याने दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या एका 'समझोत्याचा' दावा केला आहे.

‘समझोत्या’चा दावा आणि नवे प्रश्न

विपिन भाटीच्या घराशेजारी राहणारे प्रकाश प्रधान यांनी आरोपी कुटुंबाची बाजू घेत सांगितले की, ज्यावेळी निक्की भाजली, त्यावेळी तिचा पती आपल्या मुलासोबत कार स्वच्छ करत होता. वरून कंचनच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण वरच्या मजल्यावर धावले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रधान यांनी सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान दोन्ही कुटुंबं सोबत होती, पण त्याच वेळी निक्कीच्या माहेरच्या लोकांनी हत्येचा आरोप करायला सुरुवात केली.

प्रकाश प्रधान यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर विपिनच्या कुटुंबाने निक्कीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मागितला. सुरुवातीला निक्कीचे माहेरचे लोक यासाठी तयार नव्हते. पण विपिनचे वडील आणि समाजातील इतर लोकांनी त्यांना अनेकदा विनंती केली की, आपल्या सुनेच्या अंतिम संस्काराचा त्यांना अधिकार आहे. यानंतर निक्कीच्या माहेरच्यांनी एक अट ठेवली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही मृतदेह अंतिम संस्कारासाठी देऊ, पण त्याबदल्यात तुम्ही वचन द्या की, जेव्हा आम्ही निक्की आणि कंचनच्या मुलांना परत घेऊन जाऊ, तेव्हा आम्हाला कोणीही थांबवणार नाही.’ दोन्ही कुटुंबं या अटीवर सहमत झाली, आणि त्यानंतर विपिनच्या मुलाने व वडिलांनी मिळून निक्कीला अग्नी दिला.

सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे दावे

घटनेच्या वेळी घराबाहेर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, जेव्हा निक्की भाजली, तेव्हा तिचा पती बाहेर होता. वरच्या मजल्यावरून कंचनचा आवाज आला की, निक्कीने स्वतःला आग लावून घेतली आहे. हा आवाज ऐकून विपिन धावत गेला, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अर्जुन नावाच्या एका तरुणाने दावा केला की, निक्कीला रुग्णालयात घेऊन जात असताना तिची सासू आणि सासरेही गाडीत सोबत होते.

पोलिसांनी चार आरोपींना केली अटक

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी निक्कीची बहीण कंचनने आरोप केला की, निक्कीला तिचा पती, सासू आणि सासऱ्याने मिळून जाळून मारले. यानंतर पोलिसांनी निक्कीच्या पतीसह कुटुंबातील चार जणांना अटक केली.

या प्रकरणात निक्कीने रुग्णालयात पोलिसांना दिलेला शेवटचा जबाबही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तिने डॉक्टरांना सांगितले होते की, घरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात ती भाजली. मात्र, पोलीस तपासणीत घरात कोणत्याही स्फोटाचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे निक्कीचा मृत्यू कसा झाला, हे गूढ कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार