एकतर्फी प्रेम तरुणाला पडले महागात; महिलेने मित्रांच्या मदतीने कापले गुप्तांग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:48 IST2018-12-26T13:17:55+5:302018-12-26T13:48:01+5:30

जखमी तरुणावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिचे दोन मित्र प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली आहे. 

Ekatifi love fell in love; The woman cut off with the help of friends | एकतर्फी प्रेम तरुणाला पडले महागात; महिलेने मित्रांच्या मदतीने कापले गुप्तांग 

एकतर्फी प्रेम तरुणाला पडले महागात; महिलेने मित्रांच्या मदतीने कापले गुप्तांग 

ठळक मुद्देबळजबरी करून तो तरुण त्या महिलेला नाहक मानसिक त्रास देत असे.दोन मित्रांच्या मदतीने मारहाण करून त्याचे गुप्तांग कापले आहेमहिलेसह तिचे दोन मित्र प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली

डोंबिवली - जुनी डोंबिवली परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाचे विवाहित महिलेशी एकतर्फी प्रेम होते. प्रेमाची बळजबरी करून तो तरुण त्या महिलेला नाहक मानसिक त्रास देत असे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्या महिलेने त्या तरुणाच्या आपल्या दोन मित्रांच्या मदतीने मारहाण करून त्याचे गुप्तांग कापले आहे. ही धक्कादायक घटना नांदिवली परिसरातील एका मैदानात घडली असून याबाबत मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. जखमी तरुणावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिचे दोन मित्र प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली आहे. 

जुन्या डोंबिवलीत राहणारा सुजित सिंग (बदलेले नाव). याचे शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होते. सारखं सारखं प्रपोज करणं, तिच्याकडे पाहणं, तिचा पाठलाग करणं असे सुजित कारनामे सुरु होते. यामुळे महिलेला खूप मानसिक त्रास सोसावा लागत होता. १५ दिवसांपूर्वी त्या तरुणाने महिलेच्या पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणावरून नवरा - बायकोमध्ये खटके उडू लागले. शेवटी कंटाळलेल्या महिलेने सुजितचा काटा काढायचं ठरवून त्याला काल रात्री ८ वाजताच्या सुमारास नांदिवली येथील एका मैदानात भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे सुजित आला त्याला त्या महिलेने जाब विचारला आणि सोबत आलेल्या मित्रांनी सुजित बेदम मारहाण केली. नंतर त्यांनी सुजितचे गुप्तांग कापले. या घटनेने परिसरात खळबळ माजली. जखमी सुजितवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. 

Web Title: Ekatifi love fell in love; The woman cut off with the help of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.