ईडीची सिंधुदुर्गाच्या सीमेवर गोवा हद्दीत छापेमारी; कर्नाटकातील उद्योजकांच्या बंगल्याची झाडाझडती सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 07:08 PM2021-03-28T19:08:25+5:302021-03-28T19:09:13+5:30

ED raids : हा बंगला कर्नाटकमधील उद्योगपतीचा असल्याचे बोलले जात असून खाण घोटाळ्याच्या संबधित ही कारवाई असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. 

ED raids on Goa border at Sindhudurg border; Entrepreneurs' bungalows in Karnataka are being raided | ईडीची सिंधुदुर्गाच्या सीमेवर गोवा हद्दीत छापेमारी; कर्नाटकातील उद्योजकांच्या बंगल्याची झाडाझडती सुरू  

ईडीची सिंधुदुर्गाच्या सीमेवर गोवा हद्दीत छापेमारी; कर्नाटकातील उद्योजकांच्या बंगल्याची झाडाझडती सुरू  

Next
ठळक मुद्देहोळी पौर्णिमेच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सावंतवाडी : महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची केंद्राच्या अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने रविवारी  छापा टाकून घरांची तब्बल दोन तास झडती घेतली आहे.या बद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून, हा बंगला कर्नाटकमधील उद्योगपतीचा असल्याचे बोलले जात असून खाण घोटाळ्याच्या संबधित ही कारवाई असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. 

होळी पौर्णिमेच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, झडतीत काय हाती लागले याबाबत सविस्तर तपशील मिळू शकला नाही. कर्नाटक या  उद्योगपतीचे फार्महाऊस या परिसरात आहे. बंगलोर येथील पथकाने बंगल्यात येत झाडाझडती सुरू केली. त्यावेळी बंगल्याची देखभाल करण्यासाठी असलेले दाम्पत्य त्याठिकाणी होते. स्थानिक गोवा पोलिसांना देखील याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.

Web Title: ED raids on Goa border at Sindhudurg border; Entrepreneurs' bungalows in Karnataka are being raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.