'ऑन ड्युटी नाकाबंदी'वर असलेल्या पोलिसाला दुचाकीची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 17:12 IST2019-03-12T17:07:07+5:302019-03-12T17:12:29+5:30
ही घटना काल रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.

'ऑन ड्युटी नाकाबंदी'वर असलेल्या पोलिसाला दुचाकीची धडक
मुंबई - भांडूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अतुल मोरे (५०) हे ऑन ड्युटी नाकाबंदीवर असताना अज्ञात दुचाकीस्वाराने बेदरकारपणे वाहन चालवून त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात मोरे जखमी झाले असून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ही घटना काल रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.
भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एलबीएस रोडवर अतुल मोरे हे नाकाबंदीसाठी कर्तव्यावर होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ऍक्टिव्ह चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून पोलिसाला धडक दिली. या धडकेत पोलीस हवालदार अतुल मोरे हे जखमी झाले असून त्यांच्या पाठीचे हाड मोडले असून त्यावर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. भांडूप पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग पोलीस काढत आहेत.