CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये दारू नाही मिळाली म्हणून प्यायले स्पिरिट अन् तळीरामांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:32 PM2020-04-03T16:32:08+5:302020-04-03T16:35:52+5:30

CoronaVirus : गुरुवारी पहाटे दोघांचेही मृतदेह जुही नहरियास्थित काकोनी कंपाउंडसमोर त पडलेले आढळले.

During Lockdown, no alcohol was found so the drunken spirit and two friend had died pda | CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये दारू नाही मिळाली म्हणून प्यायले स्पिरिट अन् तळीरामांचा गेला जीव

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये दारू नाही मिळाली म्हणून प्यायले स्पिरिट अन् तळीरामांचा गेला जीव

Next
ठळक मुद्देजुही नहरिया येथील काकोनी कंपाऊंडसमोर राहणारा  मनोज कुमार (38) आणि फरूखाबाद फतेहगड येथील मूळ रहिवासी असलेल्या  संतोष कुमार उर्फ श्यामू (35) यांचे मृतदेह एकमेकांपासून काही अंतरावर सापडले.संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. संतोषचे कुटुंब वाट पहात आहे.

कानपूरच्या जुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूचे व्यसन असलेल्या दोन मित्रांनी लॉकडाऊनमध्ये दारू न मिळाल्याने स्पिरिट पिऊन त्यांनी तलब मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही जागीच पडून मरण पावले. 

गुरुवारी पहाटे दोघांचेही मृतदेह जुही नहरियास्थित काकोनी कंपाउंडसमोर त पडलेले आढळले. त्याचवेळी परिसरातील रहिवासी भेसळयुक्त मद्यपान करून मृत्यूची भीती बाळगतात. शवविच्छेदन रिपोर्टनंतर पोलिसांनीमृत्यूचे कारण स्पष्ट असल्याचे सांगितले. जुही नहरिया येथील काकोनी कंपाऊंडसमोर राहणारा  मनोज कुमार (38) आणि फरूखाबाद फतेहगड येथील मूळ रहिवासी असलेल्या  संतोष कुमार उर्फ श्यामू (35) यांचे मृतदेह एकमेकांपासून काही अंतरावर सापडले.


बुधवारी दोघे एकत्र फिरताना दिसले, असे परिसरातील लोकांनी सांगितले. दोघांनाही दारूसह अमली पदार्थ सेवनाचे व्यसन होते आणि दारूची दुकाने बंद केल्याने ते व्यधीत झाले होते. अनेकदा मेडिकल स्टोअरमधून स्पिरीट प्यायचे. पोलीस स्टेशन प्रभारी संतोष आर्या यांनी सांगितले की, मनोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तर संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. संतोषचे कुटुंब वाट पहात आहे.


Web Title: During Lockdown, no alcohol was found so the drunken spirit and two friend had died pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.