शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 20:58 IST

 पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्‍या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती.

ठळक मुद्दे ही घटना करणकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रोजंदारी असलेल्या 35 वर्षीय आरोपीने चार वेळा लग्न केले होते.अल्पवयीन मुलगी घरी परतल्यानंतर लॉकडाऊनदरम्यान बापाने अनेकदा बलात्कार केला. शिवाय आरोपीच्या या निर्दयी कृत्याबाबत घरच्यांना माहिती नव्हती.

हैदराबाद - तेलंगणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान विकाराबाद जिल्ह्यात  एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्‍या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती.ही घटना करणकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रोजंदारी असलेल्या 35 वर्षीय आरोपीने चार वेळा लग्न केले होते. त्याचे पहिले दोन विवाह घटस्फोटासह संपले तर तिसर्‍या पत्नीचे निधन झाले. पीडित मुलगी त्याच्या तिसऱ्या पत्नीपासून जन्माला आली होती. सध्या तो आपली आई, त्यांची पत्नी, त्यांच्या मुलासह राहत होता. कोविड -१९ च्या साथीच्या आजारांमुळे मार्चमध्ये शैक्षणिक संस्था बंद केल्यामुळे ती अल्पवयीन मुलगी घरी परतली.

 

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलगी घरी परतल्यानंतर लॉकडाऊनदरम्यान बापाने अनेकदा बलात्कार केला. शिवाय आरोपीच्या या निर्दयी कृत्याबाबत घरच्यांना माहिती नव्हती. नुकत्याच एका सणाच्या आधी मुलीवर अखेरचे लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. तिने कोणालाही काही सांगितले तर तिला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागण्याची धमकी आरोपीने दिली. काही दिवसांपूर्वी, मुलीने  तिच्या सावत्र आईकडे तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यानंतर तिने  पोलिसांकडे संपर्क साधला आणि त्याविरूद्ध तक्रार दाखल केली. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसTelanganaतेलंगणा