क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी दोन जणांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 14:37 IST2021-06-13T14:35:08+5:302021-06-13T14:37:15+5:30
Crime News : पोलिसाचे बनावट ओळखपत्र दाखवून या दोघांची झडती घेतली.

क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी दोन जणांना लुटले
जळगाव : क्राइम ब्रांचमधून आल्याचे सांगून दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी प्रदीप पुरूषोत्तम सोमानी (वय ५१,रा.सोमानी गल्ली, पिंप्राळा) या व्यावसायिकाच्या गळ्यातील वीस ग्रॅमची सोन्याची साखळी, तीन हजार रुपये रोख तर सुनील पितांबर चौधरी (वय ६०, रा. आयोध्यानगर) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी, ९ ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम अंगठी असा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी सकाळी साडेअकरा ते बारा या दरम्यान घडली.
तीस मिनिटांच्या अंतरात या दोन घटना घडल्या. सोमानी यांना पिंप्राळा येथील भवानी माता मंदीराजवळ तर चौधरी यांना इच्छा देवी चौकात नजीक असलेल्या बेंद्रे हॉस्पिटलजवळ लुटण्यात आले. पोलिसाचे बनावट ओळखपत्र दाखवून या दोघांची झडती घेतली.