अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:11 IST2022-01-11T18:09:57+5:302022-01-11T18:11:41+5:30

Due to superstitious father murdered Son : अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 28 वर्षीय दिनेश दावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले.

Due to superstitious father cuts 5 year old son with axe in alirajpur, Mp | अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

अलीराजपूर - मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी एका पित्याने आपल्याच ५ वर्षाच्या मुलाची हत्या केली. निर्दयी पित्याने निष्पाप मुलाचे कुऱ्हाडीने सात तुकडे केले.

अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 28 वर्षीय दिनेश दावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले. आपला मुलगा कुटुंबासाठी अशुभ असल्याची भीती दिनेशला वाटत होती. वडिलांच्या मनात आपल्या मुलाबद्दल विपरीत विचाराने घर केले. आपला मुलगा सैतान आहे आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर संकटांवर संकट कोसळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर वडिलांनी त्याला घरासमोरील जमिनीत गाडले. त्याला दफन करत असताना गावच्या सरपंचाची नजर त्याच्यावर पडली. सरपंचाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. चौकशीत या घटनेत वडिलांना एका तरुणाने मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली. दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Due to superstitious father cuts 5 year old son with axe in alirajpur, Mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.