शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

जेवण उशिरा करण्याच्या कारणावरुन मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 5:16 PM

बहिणीवर वार करुन केले गंभीर जखमी

ठळक मुद्देवाघोली येथील गणेशनगर परिसरातील घटना.

पुणे : जेवण उशिरा का तयार केले' या कारणावरुन भांडण काढुन रागाने चिडुन जाऊन जन्मदात्या आईवर घरातील चाकुने पोटात जीवघेणा वार करुन जिवे ठार मारल्याची घटना वाघोली येथील गणेश नगर परिसरातील 'तारा तरंग'या सोसायटीत घडली. आईला वाचवण्यासाठी गेलेल्या बहीणसही या निर्दयी भावाने चाकुने जीवघेणा हल्ला करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले.घटनेत मृत पावलेल्या आईचे नाव लिलाबाई शामराव चव्हाण (वय५२वर्षे)असुन, जखमी बहिणीस उपचारासाठी वाघोलीतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात करण्यात आले आहे.     गणेश शामराव चव्हाण, वय-३५ वर्षे(रा.तारातरंग सोसायटी,गणेश नगर,वाघोली)असे हल्लेखार आरोपीचे नाव असून,याबाबत बहीण प्रिया रवींद्र भोसले,वय-२४ वर्षे(रा.कात्रज,पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी भावा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.     ही घटना काल रात्री ८ ते ९ च्या दरम्यान वाघोली येथील रासयोनी महाविद्यालयाजवळील 'तारातरंग' सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लटमध्ये घडली.       हवेली उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांच्या सह,कालचं नव्याने नियुक्त झालेले लोणीकंद पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली व त्यानुसार पोलीसांना तपासाच्या सुचना दिल्या.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक केशव वाबळे व लोणीकंद पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस